प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने जाहीर केलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतील पहिल्या हप्त्यापोटी १७२० कोटी इतका निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली. याबाबतचा शासन निर्णय आज निर्गमित झाला आहे, अशी माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

- राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
- दोन हजारांचा पहिला हफ्ता लवकरच
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पहिल्या हप्त्याला मंजुरी देण्यात आली. दोन हजार रुपयांचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच जमा होणार आहे. या योजनेसाठी १,७२० कोटी रुपयांच्या निधीला मान्यता देण्यात आती.
राज्य सरकारच्या निर्णयामुळे या प्रत्येक पात्र शेतकऱ्यांला राज्य सरकारकडून वर्षाकाठी सहा हजार रुपये मिळणार आहेत. एप्रिल ते जुलै २०२३ कालावधीसाठी पहिला हप्ता शेतकन्यांच्या खात्यात जमा होणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारचे मिळून राज्यातील शेतकऱ्यांना वर्षात एकूण १२ हजार रुपये मिळणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना या योजनेची घोषणा केली होती.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत एप्रिल २०२३ ते जून २०२३ या कालावधीसाठीच्या पहिल्या हप्त्याला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. त्यामुळे आता शेतकन्यांच्या खात्यात लवकरच पहिला हप्ता जमा होणार आहेत. यासाठी १.७२० कोटी रुपयांच्या निधीला शासनाने मान्यता दिली आहे.
उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही योजना जाहीर केली होती. या योजनेचा फायदा राज्यातील शेतकऱ्यांना होणार आहे. केंद्र सरकारच्या पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या धर्तीवर ही योजना लागू करण्यात आली आहे
सन २०२३ – २४ च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ ही योजना उपमुख्यमंत्री व तत्कालीन वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषित केली होती. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रतिवर्ष प्रति शेतकरी रुपये ६००० या अनुदानामध्ये राज्य शासनाच्या आणखी ६००० इतक्या निधीची भर घालणारी नमो शेतकरी महासन्माननिधी ही योजना राबवण्यास जून २०२३ मध्ये मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार या योजनेअंतर्गत एप्रिल ते जुलै २०२३ या कालावधीच्या पहिल्या हप्तापोटी १७२० कोटी इतका निधी वितरित करण्यास आज मान्यता देण्यात आली आहे.
अशी आहे सन्मान योजना
- शेतकरी महा सन्मान निधी ही केंद्राच्या पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेसारखीच आहे.
- योजनेनुसार पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर महाराष्ट्र सरकार वर्षाला सहा हजार रुपये जमा करेल.
- केंद्र सरकारकडून दर तीन महिन्यांनी दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतात.
- याप्रमाणेचआता राज्य सरकारही दर तीन महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हज़ार रुपये जमा करेल.
- यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्षाला केंद्राचे सहा हजार आणि राज्य सरकारचे सहा हजार असे एकूण १२ हज़ार रुपये जमा होतील.