GR-सन २०२३-२४ करिता राष्ट्रीय कृषि विकास योजना-प्रति थेंब अधिक पीक योजनेंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गाकरिता रु.१२.०५ कोटी निधी वितरीत करणे.
प्रस्तावना : सन २०१५-१६ पासून प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत प्रति थेंब अधिक पीक घटकाची अंमलबजावणी राज्यात करण्यात येत आहे. राष्ट्रीय कृषि विकास योजना – प्रती थेंब अधिक पीक ही योजना केंद्र व राज्य शासनाच्या अनुक्रमे ६०:४० प्रमाणात अर्थसहाय्याने राबविण्यात येते. या योजनेकरिता केंद्र ्ासनाने संदर्भाधिन दि. १७ फेब्रुवारी, २०२३ रोजीच्या पत्रान्वये सन २०२३-२४ साठी केंद्र…